तुमचा मोबाईल फोन 5G ला सपोर्ट करेल का, जाणून घेण्यासाठी हा सोपा मार्ग फॉलो करा

Pune – तुमचा मोबाइल फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो की नाही हे शोधण्यासाठी, प्रथम मोबाइल फोनच्या सेटिंग्जवर जा. सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर नेटवर्क आणि इंटरनेट पर्यायावर जा आणि मोबाइल नेटवर्कवर टॅप करा. त्यानंतर तुमच्या पसंतीच्या नेटवर्क प्रकारावर टॅप करा. तुमचा मोबाईल फोन सपोर्ट करत असलेल्या नेटवर्कची सूची दिसेल. यात 2G, 3G, 4G दिसेल.

जर या यादीमध्ये 5G चा पर्याय दिसत असेल तर याचा अर्थ तुमचा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. जर तुम्हाला 5G नेटवर्क वापरायचे असेल तर तुम्हाला नवीन मोबाईल फोन घेण्याची गरज नाही. जर 5G नेटवर्क समर्थित नसेल तर तुम्ही 4G नेटवर्क वापरू शकता, परंतु 5G नेटवर्क वापरण्यासाठी तुम्हाला 5G नेटवर्क समर्थित फोन खरेदी करावा लागेल.

5G नेटवर्क सपोर्ट असलेला मोबाईल फोन खरेदी करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा

तुमचा मोबाईल फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करत नसल्याची माहिती मोबाईल फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला मिळाली असेल आणि तुम्हाला नवीन मोबाईल फोन घ्यायचा असेल, तर आता प्रतीक्षा करा. देशात अद्याप 5G नेटवर्क पूर्णपणे सुरू झालेले नाही. सुरुवातीला हे फक्त काही शहरांमध्ये सुरू केले जात आहे. जर तुम्हाला 5G नेटवर्क सपोर्टेड फोन घ्यायचा असेल तर काही वेळ थांबा. 4G फोनच्या तुलनेत 5G फोनची किंमत अजूनही महाग आहे. त्यामुळे मोबाईलच्या किंमती कमी होण्याची वाट पहा.