आशिया कपनंतर Shaheen Afridi पुन्हा लग्न करणार! वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Shaheen Afridi Marriage : आशिया कप 2023 नंतर (Asia Cup 2023), पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी पुन्हा एकदा लग्न करण्यास तयार आहे. शाहीनने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशाशी लग्न केले आहे. आता पुन्हा एकदा तो अंशाशी लग्न करणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर शाहीन आफ्रिदीच्या आशिया कप फायनलच्या दोन दिवसांनंतर 19 सप्टेंबर रोजी पुन्हा लग्न करणार आहे.

खरं म्हणजे शाहीन आफ्रिदीच्या पहिल्या लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. मात्र, पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि उपकर्णधार शादाब खानसारखे खेळाडूही या लग्नात दिसले नव्हते. आता दुसऱ्यांदा शाहीन आणि अंशाला त्यांचे लग्न व्यवस्थितपणे साजरे करायचे आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर शाहीनच्या लग्नाची मिरवणूक 19 सप्टेंबरला आणि त्यानंतर 21 सप्टेंबरला रिसेप्शन होणार आहे. यापूर्वी शाहीन आणि अंशाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न केले होते.

शाहीन आफ्रिदी सध्या आशिया कपसाठी श्रीलंकेत आहे. या स्पर्धेत सुपर-4 सामने खेळवले जात आहेत, त्यातील फक्त पहिला सामना पाकिस्तानमध्ये होणार होता आणि उर्वरित सर्व सामने कोलंबो, श्रीलंकेत होणार आहेत. पाकिस्तानचा संघ पुढील सामना १० सप्टेंबरला भारताविरुद्ध खेळणार आहे.

सध्या आशिया चषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये शाहीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत 3 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याचे सर्वोत्तम 4/35 आले.

 महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी बुमराह परतला, ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह भारत देणार तगडे आव्हान

राजकारणात अस्पृश्यता पाळत असल्याची घणाघाती टीका! आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल

ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीश महाजन