कसबा पोटनिवडणुकीत शैलेश टिळक असू शकतात भाजपचे उमेदवार 

Pune  : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर आज केंद्रीय निवडणुक आयोगाने (Central Election Commission) या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर केली आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, आता  कसबा विधानसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. माजी नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे , गणेश बीडकर या तिघांच्या नावाशिवाय दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या घरातील कुणाला संधी दिली जातेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या तिघांच्या नावाशिवाय दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक(Shailesh Tilak)  यांचे नाव देखील चर्चेत आहे. निवडणूक टाळण्यासाठी शैलेश टिळक यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. शैलेश टिळक हे देखील उच्चशिक्षित असून त्यांना देखील या मतदारसंघाची चांगलीच माहिती आहे. याशिवाय  पुण्याच्या राजकीय संस्कृतीचा विचार केल्यास शैलेश टिळक यांना उमेदवारी दिल्यास विरोधक देखील उमेदवार देताना १०० वेळा विचार करतील  आणि ही निवडणूक बिनविरोध देखील होऊ शकते.