पोटनिवडणूक जाहीर; भाजपकडून कसब्यातून ‘हे’ तीन मातब्बर नेते उमेदवारीच्या शर्यतीत 

Pune  :  पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर आज केंद्रीय निवडणुक आयोगाने (Central Election Commission) या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर केली आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, आता  कसबा विधानसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. माजी नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे,गणेश बीडकर (Former corporator Hemant Rasane, Dheeraj Ghate, Ganesh Bidkar) या तिघांच्या नावाशिवाय दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या घरातील कुणाला संधी दिली जातेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.