LokSabha Election 2024 | भाजप पक्षाने सूचना दिल्यास निश्चितपणे लोकसभा लढवेन; निवृत्त सनदी अधिकाऱ्याचे वक्तव्य    

लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election 2024) निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे अशी पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे.  या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी बैठकांचा धडाका सुरु असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरु आहे.

धाराशिव लोकसभेबाबत (LokSabha Election 2024) देखील महायुतीचा उमेदवार कोण असणार हा प्रश्न असतानाच धाराशिव लोकसभेबाबत येत्या 2-3 दिवसात निर्णय स्पष्ट होईल आणि भाजप पक्षाने सूचना दिल्यास निश्चितपणे लोकसभा लढवेन असं वक्तव्य निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी केलंय. परदेशींनी बंजारा बांधवांसोबत होळी साजरी केली. ते धाराशिवमधून उमेवदवारीसाठी इच्छुक आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय