ब्रेकिंग! Sharad Pawar गटाकडून निश्चित केलेल्या पक्ष अन् चिन्हांची नावं समोर, एकाची होणार निवड

NCP Party and Symbol : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाच्या हाती गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर काय निकाल लागेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आता अजित पवारांचा (Ajit Pawar) गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने (Election Comission) दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार गटाच्या नावावर झाले आहे.

त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. शरद पवार गटाने ७ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या पण अन् चिन्हांनी नाव समोर आली आहेत.

पक्षाचे नाव-
शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि शरद स्वाभिमानी पक्ष

चिन्ह-
कपबशी, सूर्यफूल, चष्मा आणि उगवता सूर्य

महत्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत – Nana Patole

Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान