घटस्फोटाच्या चर्चादरम्यान उर्मिला कोठारेच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, म्हणाली, ‘दुसरं प्रेम शोधायचं’

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. आता या चर्चांदरम्यान उर्मिला कोठारेच्या वक्तव्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

प्लॅनेट मराठीच्या ‘पटलं तर घ्या’ या शोमध्ये उर्मिलाला विचारण्यात आलं की, प्रेम म्हणजे काय? या प्रश्नावर उत्तर देत उर्मिला म्हणाली की, मैत्री आणि विश्वास यानंतर तिला पुढे विचारण्यात आलं की, पण जर त्याच प्रेमाने जखम दिली तर? यावर उर्मिला म्हणते, दुसरं प्रेम शोधायच’ उर्मिलाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.तिच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा तिच्या आणि आदिनाथच्या नात्यावर युजर्स चर्चा करताना दिसत आहेत. पण यावर कधीही आदिनाथ किंवा उर्मिलाने दुजोरा दिलेला नाही.

मात्र गेल्या काहि दिवसांपुर्वी उर्मिला आणि आदिनाथ कोठारेमध्ये दुरावा आल्याचं बोललं जात होत. पण काहीच दिवसात ही चर्चा अफवा असल्याचं स्वत: आदिनाथने सांगितलं होतं.