Ajit Pawar | “मी हा निर्णय…”, पक्षाचं नावं आणि चिन्ह आल्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया

Ajit Pawar On NCP Party And Symbol : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) घेतला आहे. विधिमंडळातील बहुमत चाचणीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. याचिकाकर्ते अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असून त्यांना पक्षाचे हे नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे, असं आयोगानं आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केलं आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वागत केलं आहे. “आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी एक्सवर पोस्टमध्ये स्वत:ला राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

Breaking! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच; निवडणूक आयोगाचा निर्णय

निखिल वागळेंच्या अडचणी वाढणार? पत्रकाराविरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार

Jitendra Awhad | ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय?