मंदिरे लष्कराच्या ताब्यात द्या, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले? शरद पवार म्हणतात…

Sharad Pawar on Prakash Ambedkar: भाजपासहित सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तयारीला लागले आहेत. तत्पूर्वी या निवडणुकीआधी काहीही होऊ शकतं, त्यामुळे मंदिरं लष्कराच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी वंचीत बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशातील महत्वाचे मंदिरं मथुरा, ज्ञानवापी, वाराणसी मंदिर निवडणूक होईपर्यंत लष्कराच्या ताब्यात द्यावी. तिथल्या मशिदी देखील लष्कराच्या ताब्यात द्या, ही माझी मागणी आहे. कारण तिथेच काहीतरी भानगड व्हायची शक्यता आहे. तिथे काहीही घडू शकते. तिथे मशिदी आहेत आता त्याला आपण मंदिरं म्हणतो.  कोणी पाडली, का पडली कुणाला माहिती, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आता यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, लोकांना अनेक शंका आहेत. लोकांना चिंता पण आहे की निवडणुकीत यश मिळवण्याची शक्यता नसेल तर तर लोकांचे लक्ष विचलित कण्यासाठी काय काळजी घ्यावी, त्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलं असेल.

“मथुरा, वाराणसीसह महत्त्वाची मंदिरे लष्कराच्या ताब्यात द्या”, प्रकाश आंबेडकर यांची मागणी