वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, अनफिट केएल राहुलची निवड; पाहा पूर्ण टीम

Indian Squad For World Cup: २०२३ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवडकर्त्यांनी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

श्रीलंकेतील कँडी येथील भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघाची घोषणा केली. अनफिट केएल राहुलची (KL Rahul) निवड करण्यात आली आहे. आशिया चषकासाठी त्याची निवड झाली, पण पहिल्या दोन सामन्यात तो खेळू शकला नाही. दुखापतीनंतर तो आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. अशा स्थितीत त्याला विश्वचषक सामन्यासाठी आपला फिटनेस सिद्ध करावा लागेल. आशिया चषकासाठी निवडण्यात आलेले तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.

वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

“मथुरा, वाराणसीसह महत्त्वाची मंदिरे लष्कराच्या ताब्यात द्या”, प्रकाश आंबेडकर यांची मागणी