Sharad Pawar Resignation : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sharad Pawar Resignation – शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तीन दिवस झाले आहेत. मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आज समितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होणार आहे. नुकताच राष्ट्रवादीच्या सदस्य समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. दुसरीकडे शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही झाले आहेत.  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.