शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या ‘कोअर कमिटी’ने फेटाळला; पुढे काय? सगळ्यांचं लक्ष

Sharad Pawar Resigns: ‘लोक माझे सांगाती’ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. शरद पवारांनी त्यावेळी चेंडू राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या कोर्टात टोलावला होता.यानंतर आता राष्ट्रवादीच्याकोअर कमिटीने शरद पवारांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला आहे.त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल याबाबत माहिती देताना म्हणाले, “शरद पवारांनी कुणालाही विश्वासात न घेता राजीनाम्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनीच नेमलेल्या समितीने त्यांची वारंवार भेट घेतली आणि आज यावर बैठक घेऊन एक ठराव मंजूर केला. यानुसार, शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला होता. तो राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांनीच अध्यक्ष म्हणून रहावं, अशी विनंती आम्ही करतो,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.