Sharad Pawar | शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ, हीच मोदींची गॅरंटी

Sharad Pawar |  आश्वासन, टीका-टीप्पण्णी करणं या पलिकडे  सरकारने काय केलं आहे? शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलीय, हीच मोदींची गॅरंटी आहे.असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवार साहेब म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, लोकशाहीला संकटात नेहणारा कारभार मोदींकडून सुरू असून सामान्य माणसांचे अधिकार उध्वस्त होतील. त्यामुळं लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, तुम्ही सर्वांना यात सहभागी व्हायला हवं असे आवाहन शरद पवार यांनी केले.

पुढे शरद पवार म्हणाले की, पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही. जवाहरलाल नेहरुंबद्दल काहीही बोललं जातं आहे. गांधी, सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांचं योगदान हा देश स्वतंत्र करण्यासाठी होतं. अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायची असते. आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देत आहेत. त्याच मोदींची गॅरंटी देत आहेत, पण ही कोणाच्या पैशाने जाहीरात दिली जात आहे. आज ते सांगत आहेत की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवतो. गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी गॅरंटी दिली असेही शरद पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं