महाराष्ट्राला महिला धोरण देणाऱ्या शरद पवार यांच्या पुतण्याला हे शोभादायक नाही; कुलकर्णींचा निशाणा

पुणे :  चिंचवडमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीका केली होती.  नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. सर्व पडले की नाही? राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात पडले. दुसऱ्यांदा वांद्रे की कुठे तरी पडले. हा. तिथे पडले. तिथे तर महिलेने पाडलं. बाईनं पाडलं. बाईंन. ही त्यांची प्रत्येकाच काय परिस्थिती आहे. असा टोला अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर लगावला.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांनी अजित दादांना खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले,  भाजपवाले महिलांविषयी ज्या असभ्य भाषेत बोलले त्याचा आपण नेहमीच निषेध करतो..पण या video त अजित पवार नारायण राणेंविषयी बोलताना त्यांना बाईने पाडले बाईने पाडले असे ज्याप्रकारे सांगत आहेत व ज्या प्रकारचे हावभाव करत आहेत ते धक्कादायक आहे.

महिलेने निवडणुकीत पाडले म्हणजे पुरुषाची जास्त नामुष्की हे गृहितक त्यांच्या मनातील सरंजामी पुरुष दाखवतो…महाराष्ट्राला महिला धोरण देणाऱ्या शरद पवार यांच्या पुतण्याला हे शोभादायक नाही….राजकारण वगळून अशा सर्वपक्षीय वृत्ती दिसेल तेव्हा धिक्कार करायला हवा असं देखील कुलकर्णी यांनी म्हटले आहे.