कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त 100 किलोचा केक कापला; अख्या गावाला दिले जेवण , पहा व्हिडीओ

बेळगाव –  भारतातील लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यावर खूप प्रेम करतात.  काहीजण त्यांच्या कुत्र्यांसाठी लाखोंचे कपडे आणतात तर काही त्यांच्या राहण्यासाठी आलिशान घरे बांधतात. असाच काहीसा प्रकार कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात घडला. येथे एका कुटुंबाने आपल्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा केला की तो चर्चेचा विषय ठरला.

हे प्रकरण बेळगावी जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील तुक्कनाटी गावचे आहे. येथे एक कुटुंब राहते. ज्याच्याकडे पाळीव कुत्रा आहे आणि त्याचे नाव क्रिस आहे. गुरूवारी क्रिसचा वाढदिवस होता आणि शिवप्पा आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांचा पाळीव कुत्रा क्रिशचा वाढदिवस संपूर्ण गावाच्या लक्षात राहील अशा पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. त्यासाठी घरातील लोकांनीही गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू केली होती, गावातील सुमारे 4 हजार लोकांना मेजवानीचे निमंत्रण पाठवले असता त्यांनाही सुरुवातीला काही समजले नाही, मात्र कार्यक्रम सुरू झाल्यावर गावकरीही आश्चर्यचकित झाले.

कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त प्रथम 100 किलोचा केक आणण्यात आला, डीजे आदींची व्यवस्था करण्यात आली. क्रिशने केक कापल्यानंतर गावकऱ्यांना मेजवानी देण्यात आली, ज्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. क्रिशसोबत कुटुंबानेही संपूर्ण गावात मिरवणूक काढली. शिवप्पाने आपल्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशा प्रकारे साजरा केला, असा सवालही काही लोकांनी केला. याबाबत शिवप्पा म्हणाले की,  त्याच्या कुटुंबात क्रिशसारखा विश्वासू कोणीही नाही, क्रिश त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेतो, आवाजहीन आहे तरीही त्याने कुटुंबाचा विश्वास जिंकला आहे.