मोठी बातमी! चिंचवडमध्ये मतदान केंद्राबाहेर नेतेमंडळी भिडले; एकमेकांना केली धक्काबुक्की 

पुणे – सत्ताधारी शिवसेना-भाजप युती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीची (MVA) प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अनुक्रमे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे.

या पोटनिवडणुकीत भाजपने कसबा पेठमधून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या महाविकास आघाडीने भाजपविरोधात उमेदवार दिले आहेत. कसब्याची जागा काँग्रेस लढत असून येथून रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे रिंगणात आहेत.

दरम्यान, पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर गणेश जगताप आणि माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून धक्काबुक्की झाली. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती निवळली, दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आहेत.