शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या गनिमी काव्याशी तुलना, आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने नवा वाद 

Mumbai – शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी एकनाथ शिंदेच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली आहे. त्यामुळे छत्रपतीच्या अपमानाच्या मुद्द्यावरून शिंदे-भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना शिवरायांशी केली. त्यानंतर मोठं वादंग निर्माण झालं. त्यानंतर काल मंगलप्रभात लोढा यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी केली. यानंतर आता संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदेच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली आहे.