सर्व निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा; सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठींच्या सूचना

सोलापूर –  सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सर्व समस्या व जिल्ह्यातील रखडलेले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे (Uddhav Thackrey) सक्षम असून तुमच्या पाठीशी ते ताकतीने उभा राहतील. मात्र येणाऱ्या सर्व निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा असा सूचना शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी दिल्या

शिवसेना भवन येथे आज जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार अनिल देसाई यांनी घेतली यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल शिवसेनेच्या नेत्या रश्मी  बागल (Shiv Sena leader Rashmi Bagal) माढा विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजय बाबा कोकाटे (Sanjay Baba Kokate)  शिवसेनेचे नेते सोमेश शिरसागर उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख काळज उपस्थित होते

यावेळी संजय बाबा कोकाटे यांनी उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याची हक्काचे पाणी पुणे जिल्ह्याला पळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे पदाधिकारी करत असून या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी तात्काळ बैठक लावावी अशी मागणी केली सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी बदलासंदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती असून येणाऱ्या निवडणुकांपूर्वी खांदेपालट करावा अशी मागणी केल्याचे समजते.