Raj Thackeray | “बुजुर्ग काकांचा पक्ष हिसकावणं सोप्पं, पण…”; मनसेचा अजित पवारांना खोचक टोला

Raj Thackeray On Ajit Pawar : शिवसेना (Shivsena) पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या हाती गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि चिन्हावर काय निकाल लागेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आता अजित पवारांचा (Ajit Pawar) गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने (Election Comission) दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. शरद पवार गटाने ७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले आहे तर काहींनी त्यावर टीका केली आहे. मनसेच्या (Raj Thackeray) पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय की, बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ !

महत्वाच्या बातम्या –

Breaking! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच; निवडणूक आयोगाचा निर्णय

निखिल वागळेंच्या अडचणी वाढणार? पत्रकाराविरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार

Jitendra Awhad | ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय?