Shivajirao Adhalrao Patil | लांडेंच्या भेटीने समीकरणे बदलली; शिवाजीराव आढळरावांचे पारडे झाले जड

Shivajirao Adhalrao Patil : उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी केला आहे. लांडे यांची नाराजी दूर करण्यात आढळरावांना यश आल्यास त्यांच्या ते पथ्यावर पडणार आहे.

महायुतीमधील अजित दादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शिरूरसाठी उमेदवारी मिळेल असा आडाखा माजी आमदार विलास लांडे यांनी बांधला होता. दरम्यानच्या काळात उमेदवारीवरून राजकीय घमासान झाले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाबत मतदारसंघ विजयी होण्यासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश घडवून आणत त्यांना उमेदवारी देखील बहाल करण्यात आली. या निर्णयामुळे भोसरीचे चाणक्य असलेले विलास लांडे नाराज झाले. उमेदवारी आढळरावांना जाहीर झाल्यापासून ते राजकीय विजनवासात गेल्याचे चित्र होते. माध्यमांना त्यांनी त्यानंतर प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तसेच राजकीय सार्वजनिक कार्यक्रमांना दांडी मारण्यास त्यांनी सुरुवात केली.

भोसरी विधानसभेत तब्बल  पाच लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. या मतदारसंघात असणारे विलास लांडे हे महत्वाचे आणि मोठे नेते आहेत. लांडे नाराज झाले तर त्याचा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो याची जाणीव आढळराव पाटील यांना आहे. त्यामुळे त्यांनी भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविलयातील कार्यालयात जाऊन लांडे यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर केली. आता या सर्वांचा प्रत्यक्ष निवडणुकीत किती फायदा होतो पाहणे रंगतदार ठरणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला