Narendra Modi | ‘दिशाहीन विरोधकांकडे, देशाच्या विकासासाठी कोणतीही दृष्टी नाही’

दिशाहीन विरोधकांकडे, देशाच्या विकासासाठी कोणतीही दृष्टी नाही, अशी टीका पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल चंद्रपूरमध्ये केली. महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) तसंच गडचिरोली चिमूर मतदार संघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

विरोधक कायम विकासकामात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात; असं सांगून ते म्हणाले की रालोआ सरकारच्या काळात महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या इतर भागातही नक्षलवाद कमी झाला असून विकासाला चालना मिळाली आहे.

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांना जनता निवडून देईल, असा विश्‍वासही मोदींनी (Narendra Modi) यावेळी व्यक्त केला. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत त्यांनी मराठीतूनच जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, यांच्यासह महायुतीतील विविध पक्षांचे नेते, आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला