वाचाळवीर पटोले पुन्हा बरळले; आता चक्क महात्मा गांधींबाबत केले ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य

मुंबई – गेल्या काही दिवासांपासून नाना पटोले (Nana Patole) त्यांच्या खळबळजनक विधानांमुळे वादात सापडले असताना, काल नाना पटोलेंनी पुन्हा एक खळबळजनक विधान केलंय. महात्मा गांधींबाबत (Mahatma Gandhi) बोलताना नथुराम गोडसेने (Nathuram Godase) महात्मा गांधींचा वध केला असं वक्तव्य केल्याने पुन्हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा आजच्याच दिवशी नथुराम गोडसे नावाच्या आतंकवाद्याने वध केला. महात्मा गांधी संपले असे हिंदुत्ववादी व्यवस्थेला वाटत असेल पण महात्मा गांधी आजही त्यांच्या विचाराने जिवंत आहेत व त्यांचे विचार भविष्यातही जिवंत राहतील, असं नाना पटोले म्हणाले. मात्र त्यात ‘वध’ या शब्दामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

दरम्यान, ‘महात्मा गांधींचा वध’ हा शब्द प्रयोग केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काॅग्रेसनं कायमच महात्मा गांधींचा वध या शब्द प्रयोगाला विरोध केलाय. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षांनीच हा शब्दप्रयोग केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.