‘विराटला गोलंदाजी द्या’, चाहत्यांच्या मागणीवर कोहलीची लई भारी रिऍक्शन; Video Viral

India vs Sri lanka World Cup 2023: विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) 302 धावांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) झालेल्या या सामन्यात श्रीलंकेला अवघ्या 55 धावांमध्ये गारद करत; भारतानं या स्पर्धेतला आपला सलग सातवा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं आठ गडी गमावत 357 धावा केल्या. शुभमन गिलनं सर्वाधिक 92 धावा केल्या. 358 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला केवळ 55 धावाच करता आल्या. श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. भारताकडून पाच गडी बाद करणाऱ्या मोहम्मद शमीला (Mohammad Shami) सामनावीर घोषित करण्यात आलं.

दरम्यान, कोहलीचे (Virat Kohli) अनेक चाहते स्टेडियमवर पोहोचले होते. सामन्यादरम्यान त्याने एक मनोरंजक मागणी केली. चाहत्यांनी वानखडेत कोहलीला गोलंदाजी देण्याची मागणी केली. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. X वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यातच कोहलीचे चाहते त्याला गोलंदाजी देण्याची मागणी (Virat Kohli Bowling) करत आहेत. हा व्हिडिओ हजारो चाहत्यांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

कोहलीने फलंदाजीत कमाल दाखवली आहे. यासोबतच त्याने गोलंदाजीही केली आहे. त्याने आतापर्यंत 49 एकदिवसीय डावात 4 बळी घेतले आहेत. कोहलीने 13 टी-20 आंतरराष्ट्रीय डावात 4 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने आयपीएलमध्येही विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, त्याला कसोटीत एकही विकेट मिळाली नाही.

महत्वाचे बातम्या-

ते सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते; प्रकाश सोळंके यांनी सांगितली आपबीती

मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद; म्हणाले,….

राज्य सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन; अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे