मी आज चप्पल फेकली, पुढे राऊत जिथे दिसतील तिथे त्यांच्यावर दगड फेकणार; ‘त्या’ व्यक्तीचा इशारा

नुकतीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर इंदापुरमध्ये चप्पलफेक झाल्याची घटना घडली. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून चप्पलफेक झाल्याचा दावा केला जात आहे. हे प्रकरण ताजे असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गाडीवर रविवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमाराला चप्पल फेकण्यात आली. सोलापूर येथील बाळे उड्डाणपुलाजवळ हा प्रकार घडला. उड्डाणपुलावरुन ही चप्पल फेक झाली. या चप्पलफेकीनंतर उड्डाणपुलावरुन ‘नारायण राणे झिंदाबाद’च्या घाेषणा आल्या.

आता संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पल भिरकवणाऱ्या व्यक्तीचं नाव पुढे आलं आहे. त्या व्यक्तीने संजय राऊत यांना चेतावणीही दिला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर चप्पल भिकावणाऱ्याचं नाव सागर शिंदे असं आहे. सागर शिंदेने टीव्ही9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करत असतात. त्याचबरोबर मराठा मूक मोर्चाला मुक्का मोर्चा असे संजय राऊत यांनी हिणवले होते. या सर्व गोष्टीचा राग माझ्या मनात होता म्हणून मी आज चप्पल फेकली, असं सागर शिंदेने म्हटलं आहे.

मला तिथे केवळ चपल्या सापडल्या. त्यामुळे मी चप्पल फेकली. या पुढच्या काळात राऊत जिथे दिसतील तिथे त्यांच्यावर दगड फेकणार आहे, असा संतप्त इशारा सागर शिंदे याने दिला आहे. सागर शिंदे याच्या या इशाऱ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki