श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मामध्ये काहीतरी शिजतंय? ‘तो’ फोटो तुफान व्हायरल

भारतीय क्रिकेटपटू सध्या आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये व्यस्त आहेत. मात्र भारतीय फलंदाज आणि आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या घरी विश्रांती घेत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो आयपीएलमध्ये सहभागी झालेला नाही. तरीही सोशल मीडियावर त्याची भरपूर चर्चा सुरू आहे. भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal Wife) याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Varma) हिच्यासोबत एका पार्टीत एकत्र दिसल्याने श्रेयस चर्चेत आला आहे.

त्याचे झाले असे की, श्रेयस आणि चहलची पत्नी धनश्री त्यांच्या कॉमन फ्रेंडच्या घरी इफ्तार पार्टीदरम्यान माफिया गेम खेळताना दिसले आहेत. चहल सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळण्यात व्यस्त असल्याने तो या गेममध्ये सहभागी नव्हता. श्रेयसची अय्यरची बहिण श्रेष्टा अय्यर, आर अश्विनची पत्नी प्रीति नायारणन यादेखील या गेममध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळचा फोटो धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला ठेवला होता. यावेळी या फोटोच्या मागे श्रेयस अय्यरही उभा असल्याचे दिसते. अशाप्रकारे धनश्री आणि श्रेयसला एकत्र पाहिल्याने नेटकरी वेगवेगळे तर्कवितर्क लावू लागले आहेत. या दोघांमध्ये काहीतरी डाळ शिजत आहे, असे अनेक नेटिझन्सचे म्हणणे आहे.

यापूर्वीही श्रेयस आणि धनश्री बऱ्याचदा एकत्र दिसले आहेत. धनश्रीचा श्रेयससोबत एका रीलवर डान्स करतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर आहे. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकत्र दिसल्याचे त्यांच्यात काहीतरी सुरू आहे, अशा अफवांना हवा मिळाली आहे.