नथुराम गोडसे यांचा जो खटला चालला,त्यामध्ये नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता; सदावर्ते पुन्हा बरळले 

मुंबई: गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte ) आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचाही फोटो लावल्याचे पहायला मिळाले. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (State Transport Co-operative Bank) निवडणुकीसाठी सदावर्तेंच्या संघटनेचे पॅनल उतरले आहे. यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.

महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचा आदारार्थी उल्लेख करून सदावर्ते यांनी त्यांच्यासोबत न्याय झाला नसल्याचे वक्तव्य केले आहे. मी गांधींच्या मतांशी सहमत नाही. मी नथुराम गोडसे यांचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवरायांसोबत लावला आहे. मी संविधानाचा अभ्यासक आहे. नथुराम गोडसे यांचा जो खटला चालला. त्यामध्ये नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता. मी संविधानामध्ये PhD केली आहे. मी अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की गोडसे यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आहे. नथुराम गोडसे यांच्यावरील खटला हा मानवाधिकाराविरोधातील असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. नथुराम गोडसे इथून पुढे माझ्या चळवळीत असतील असेही त्यांनी म्हटले.