जेष्ठ व्यक्तींबद्दल वा त्यांच्या आजारावर बोलण्याचा केतकीला अधिकार काय ? पवारांवरील टीकेमुळे राष्ट्रवादी आक्रमक

पुणे – प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Famous actress Ketki Chitale) ही सोशल मिडीयावर (Social media) चांगलीच सक्रीय असते. तिने केलेल्या काही पोस्टसवरून अनेकदा वाद देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. आता देखील तिने एक पोस्ट केली असून या पोस्टवर अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. नितीन भावे (Nitin Bhave) यांची मूळ ही पोस्ट आहे मात्र केतकीने ती पोस्ट शेअर केल्याने आता तिला ट्रोल केले जाऊ लागले आहे.

दरम्यान, केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये (Kalva Police Staion) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता केतकी चितळे अडचणीत आली आहे.

आता यावर, राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) म्हणाले, केतकी चितळे नावाची एक बाई गेल्या काही दिवसांपासून अनेक वेळेला फेसबुक (Facebook) वरती आपल्या वैफल्यग्रस्त अवस्थेमुळे जेष्ठ नेत्यांबद्दल /राष्ट्रपुरुषांबद्ददल आपली गरळ ओकत असते चित्रपट सृष्टीमध्ये काम न मिळाल्यामुळे ही बाई अत्यंत वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये कुठेतरी आपल्याला महत्त्व मिळावे म्हणून वारंवार महाराष्ट्राचा अपमान करीत असते. जेष्ठ व्यक्तींबद्दल वा त्यांच्या आजारावर बोलण्याचा ह्यांना अधिकार काय ? राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजीनगर येथील सायबर सेल (Cyber ​​Cell at Shivajinagar) ला तक्रार दाखल केलेली आहे. असं देशमुख यांनी म्हटले आहे