नुपूर शर्माचं शिर धडावेगळं करेल, त्याला मी माझं घर देईन – सलमान चिश्ती

मुंबई : वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्माने (Nupur Sharma) केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत.यातच  आता अजमेरच्या दर्ग्यामधील खादिम सलमान चिश्तीने  वादग्रस्त विधान (Controversial statement)केलं आहे. एका व्हिडीओमध्ये त्याने भाजपच्या(BJP) माजी प्रवक्त्या यांच्यावर बोलताना प्रक्षोभक विधानं केली आहे.

सलमान चिश्तीने  नुपूर शर्माचं शिर धडावेगळं करेल, त्याला मी माझं घर देईन, असं विधान त्यांनी केल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय.  दरम्यान, आता खादिम सलमान चिश्ती विरोधात पोलिसांत (Police News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस सतर्क झालेत.

काय म्हणाला खादिम सलमान चिश्ती?

व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान चिश्ती हा मद्यधुंद अवस्थेत दिसला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता पोलीस सलमानचा शोध घेत आहेत. सलमानने या व्हिडीओमध्ये म्हटलंय की,…आता पहिल्यासारखं नाही राहिलं, नाहीतर असं बोलला नसता. आईशप्पथ मी सरळ गोळ्याच घातल्या असत्या. मला माझ्या मुलांची शप्पथ, मी गोळ्या घातल्या असल्या आणि आजही छाती ठोकून सांगतोय, जो पण नुपूर शर्माचं शिर धडावेगळं करुन घेऊन येईल, त्याला माझं घर देईन आणि मी रस्त्यावर येईल, हे सलमानचं वचन आहे.

https://twitter.com/SheetalPronamo/status/1544195234623410176?s=20&t=CIqwZdnqyHP21VnSfUxMJw