उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात – संजय राऊत

मुंबई – राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून, शिवसेनेच्या (Shivsena) नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. अनेक अडचणी समोर असतानाही एकनाथ शिंदेंनी ही किमया करुन दाखवली. दरम्यान, काल अभिनंदन प्रस्तावावेळी बोलताना आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी माजी मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सोबत असणाऱ्या काही नेत्यांची नाव न घेता धुलाई केली.

पाटील यांनी केलेली ही टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना चांगलीच झोंबली आहे. बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच ते कालपर्यंत सत्तेत होते. उद्धव ठाकरे काही दुधखळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) चिरंजीव आहेत, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. त्यांना पळून जायचं असतं तर ते काहीही कारण शोधतात. तुम्ही निघून गेलात, तर ठीक आहे, पण आता कारणं सांगू नका. आता मंत्री झाला आहात, आता मंत्र्याचं काम करा, असं संजय राऊत यांनी म्हटलं.