पडळकरांनंतर सोलापुरात संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक, ‘नारायण राणे झिंदाबाद’च्या घाेषणा

नुकतीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर इंदापुरमध्ये चप्पलफेक झाल्याची घटना घडली. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून चप्पलफेक झाल्याचा दावा केला जात आहे. हे प्रकरण ताजे असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गाडीवर रविवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमाराला चप्पल फेकण्यात आली. सोलापूर येथील बाळे उड्डाणपुलाजवळ हा प्रकार घडला. उड्डाणपुलावरुन ही चप्पल फेक झाली. या चप्पलफेकीनंतर उड्डाणपुलावरुन ‘नारायण राणे झिंदाबाद’च्या घाेषणा आल्या.

खासदार संजय राउत रविवारी साेलापूर दाैऱ्यावर आहेत. दिवसभर विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर त्यांनी सायंकाळी सहा वाजता बाळे येथील एका हाॅटेलच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते शहरात परत येत हाेते. यादरम्यान, बाळे येथील उड्डाणपुलावरुन चप्पलने भरलेली पिशवी राउत यांच्या गाडीवर टाकण्यात आली. शिवसेना कार्यकर्त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी गदाराेळ करायला सुरुवात केली. उड्डाणपुलावरुन एक कार्यकर्ता नारायण राणे जिंदाबादच्या घाेषणा देत हाेता. राउत यांच्या वाहनांचा ताफा थांबला नाही. ताे थेट शहरात आला. मात्र बाळे परिसरात तणावाचे वातावरण हाेते. पाेलिस चप्पल फेक करणाऱ्या कार्यकर्त्याचा शाेध घेत हाेते. शिवसेना कार्यकर्ते प्रशासनाविराेधात घाेषणाबाजी करीत हाेते.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki