Parineeti And Raghav: राघवच्या पावलांवर पाऊल ठेवत परिणीती घेणार राजकारणात उडी? अभिनेत्रीनं केला खुलासा

Parineeti Chopra In Politics: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आजकाल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. आम आदमी पार्टीचे युवा खासदार राघव चड्ढासोबतच्या (Raghav Chadha) लग्नानंतर ती चर्चेत आहे. सध्या दोघेही लग्नानंतर एक सुंदर काळ एन्जॉय करत आहेत. मात्र, परिणीती आणि राघव दोघेही आपापल्या कामावर परतले आहेत. मात्र या सगळ्यानंतर अभिनेत्रीने राजकारणात येण्याचा तिचा प्लॅन उघड केला.

अभिनेत्री तिच्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या हृदयावर छाप सोडण्यात अयशस्वी ठरली आहे, म्हणूनच राघव चड्ढासोबतच्या लग्नानंतर ती राजकारणात आपली इनिंग सुरू करू शकते अशी आहे. नुकतेच परिणीतीने खुलासा केला की ती राजकारणात जाणार आहे की नाही?

अलीकडेच परिणीती चोप्राने तिचा पती राघव चढ्ढा यांच्याप्रमाणे राजकारणात येण्याबाबत खुलेपणाने बोलले. तिला राजकारणात रस आहे का, असे विचारल्यावर परिणीती हसत म्हणाली, ‘मी एक अभिनेत्री आहे, तो राजकारणी आहे. त्याला बॉलीवूडबद्दल काहीच माहिती नाही आणि मला राजकारणातलं काही कळत नाही. त्यामुळे आमचे वैवाहिक जीवन चांगलेच चालले आहे. अशा स्थितीत परिणीतीच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे की, तिचे राजकारणात येण्याचे कोणतेही स्वप्न नाही आणि तिला याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाही.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki