सावधान! स्मार्टफोन चार्ज करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, नाहीतर फोनची बॅटरी होईल खराब

सावधान! स्मार्टफोन चार्ज करताना चुकूनही करू नका 'या' चुका, नाहीतर फोनची बॅटरी होईल खराब

Smartphone Charging Tips: आजच्या काळात स्मार्टफोनला खूप महत्त्व आले आहे. फोनचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. यामुळेच काही लोकांना स्मार्टफोनशिवाय दोन मिनिटेही जगणे कठीण झाले आहे. तर, काही लोकांना फोन पूर्ण चार्ज ठेवण्याची सवय असते, तर काही लोक चार्जिंगदरम्यान अशी चूक करतात, ज्यामुळे नंतर समस्या उद्भवू शकतात. चला जाणून घेऊया त्या चुकांबद्दल ज्या चार्जिंग दरम्यान चुकूनही करू नयेत.

बॅटरी चार्ज होण्यापूर्वी फोन चार्ज करा
असे बरेच लोक आहेत जे बॅटरी संपेपर्यंत फोन वापरतात. जोपर्यंत फोनची पूर्ण चार्जिंग उतरत नाही तोपर्यंत तो स्क्रोल करून वापरण्याचे चक्र चालूच असते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, काही लोक चार्जिंग अलर्ट मिळाल्यानंतरच फोन चार्जिंगवर ठेवतात. कधीही फोनची बॅटरी संपण्‍याची वाट पाहू नका, तर फोन सुमारे 20 टक्केवरच असताना तो चार्जवर ठेवा.

मूळ चार्जरनेच चार्ज करा
बर्याच लोकांसाठी, फक्त त्यांचा फोन चार्ज करणे महत्वाचे असते. अशावेळी मग ते चार्जिंगसाठी कोणतेही चार्जर वापरतात. तथापि, असे करू नये. तुम्ही नेहमी तुमच्या फोनसोबत आलेला मूळ चार्जर वापरावा.

100 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करू नका
काही लोक फोन चार्ज करण्यासाठी रात्रभर चार्जिंगवर सोडतात किंवा चार्जिंगवरुन काढायला विसरतात. अशा परिस्थितीत फोनची बॅटरी 100 टक्क्यांहून अधिक चार्ज झाल्यानंतरही ती चार्ज होत राहते. अशा प्रकारच्या चुकीमुळे तुमचा फोन अकाली खराब होऊ शकतो. फोन दीर्घकाळ चार्ज केल्याने बॅटरीवर ताण पडतो, ज्यामुळे तो खराब होण्याची शक्यता असते.

https://youtube.com/shorts/Ru1lOFo4gb8?feature=share

Previous Post
गिरीश महाजन आमच्या मंत्रिमंडळात सर्वात फिट, अजितदादांनी केले महाजनांच्या फिटनेसचे कौतुक

गिरीश महाजन आमच्या मंत्रिमंडळात सर्वात फिट, अजितदादांनी केले महाजनांच्या फिटनेसचे कौतुक

Next Post
आराध्या बच्चनच्या शाळेची फीस ऐकून सरकेल पायाखालची जमीन! देशातील 'या' महागड्या शाळेत शिकते

आराध्या बच्चनच्या शाळेची फीस ऐकून सरकेल पायाखालची जमीन! देशातील ‘या’ महागड्या शाळेत शिकते

Related Posts
money

तुम्हालाही कमी गुंतवणुकीत मोठा व्यवसाय करायचा असेल, तर ‘या’ व्यवसायाचा एकदा विचार जरूर करा

पुणे – तुम्हालाही छोट्या गुंतवणुकीत मोठा व्यवसाय करायचा असेल, तर डेअरी उत्पादन फ्रँचायझी (Dairy Franchisee) उघडणे हा एक…
Read More
Ajit Pawar

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती मारुती साळवे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के – पाटील (Senior journalist Tarachand Mhaske) आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेचे…
Read More
धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर, माही पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळू शकते; काय आहे नवा नियम

धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर, माही पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळू शकते; काय आहे नवा नियम

चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘थला’ एमएस धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीगच्या…
Read More