गिरीश महाजन आमच्या मंत्रिमंडळात सर्वात फिट, अजितदादांनी केले महाजनांच्या फिटनेसचे कौतुक

Ajit Pawar : आमच्या मंत्रिमंडळात सर्वात फिट मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) आहेत. ते साठीच्या पुढे गेले पण कुणीच म्हणणार नाही की ते साठीच्या पुढे गेले, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गिरीश महाजनांच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. पुण्यातील महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी इर्शाळवाडी सारख्या ठिकाणी गिरीश महाजन ट्रेकिंग करत गेले होते. महाजनांनी आरोग्य फिट ठेवलं आहे. महाजनांचा दंड मी नेहमीच दाबून बघतो. ते खूप फिट आहेत. त्यामुळे आमच्या मंत्रिमंडळात सर्वात फिट तेच आहेत.असं म्हणत महाजन याचं त्यांनी कौतुक केले आहे.