मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, त्यामुळे पगारी सुट्टीची गरज नाही; स्मृती इराणींचं वक्तव्यं

Smriti Irani on Menstrual leave: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळीदरम्यान महिलांसाठी सुट्टीवर एक मोठी गोष्ट सांगितली आहे. त्यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, मासिक रजेमुळे (Periods Leave) कर्मचाऱ्यांमध्ये महिलांसोबत भेदभाव होऊ शकतो. स्मृती इराणी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात या गोष्टी सांगितल्या ज्यात सरकार मासिक रजेसाठी कोणताही कायदा करण्याचा विचार करत आहे का? असे विचारण्यात आले होते.

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, “आज महिला अधिकाधिक आर्थिक संधींचा पर्याय निवडत आहेत हे लक्षात घेऊन मी यावर माझे वैयक्तिक मत देईन. आम्ही असे मुद्दे मांडू नयेत जिथे महिलांना समान संधी नाकारल्या जातात.” इराणी म्हणाल्या की, “मी स्वतः एक महिला आहे. म्हणूनच मला असे म्हणायचे आहे की मासिक पाळी हा अडथळा नाही. हा स्त्रीच्या जीवन प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. हे कोणतंही अपंगत्व नाही. मासिक पाळीकडे अपंगत्व म्हणून पाहू नये. महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी दिल्यास भेदभावाला प्रोत्साहन दिलं जाईल”

किंबहुना, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांनी एका पुरवणी प्रश्नात विचारले होते की, सरकारने महिला कर्मचाऱ्यांना ठराविक संख्येने सुट्ट्या देण्यासाठी कंपन्यांना बंधनकारक तरतूद करण्यासाठी काही उपाय केले आहेत का? मनोज झा म्हणाले की, माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली बिहार हे मासिक पाळीसाठी रजेचे धोरण तयार करणारे पहिले राज्य आहे.

सॅनिटरी नॅपकिन्सबाबतही प्रश्न विचारण्यात आले
सॅनिटरी नॅपकिन्समध्ये घातक रसायनांचा वापर थांबवण्यासाठी सरकार काही पावले उचलण्याचा विचार करत आहे का?, असा सवालही मनोज झा यांनी केला. यावर इराणी म्हणाल्या की, हा प्रश्न मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित आहे जो महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या कक्षेत नाही. सरकारने दिलेल्या सॅनिटरी पॅड्सबाबत अशी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-