साईबालाजी एज्युकेशन सोसायटी तर्फे VISTA 2k24 चे आयोजन

साईबालाजी एज्युकेशन सोसायटी तर्फे VISTA 2k24 ह्या वार्षिक इंटर-कॉलेजिएट टेक्नो-मॅनेजमेंट कल्चरल फेस्ट चे आयोजन १८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. माघील 12 वर्षांपासून हा वार्षिक इंटर-कॉलेजिएट टेक्नो-मॅनेजमेंट कल्चरल फेस्ट आयोजित करण्यात येत आहे. उत्कृष्टता, नावीन्यपूर्णता आणि तरुणांच्या उत्साहाचा संगम असलेला हा फेस्ट, विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांची प्रतिभा आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्याची संधी विध्यार्थ्यांना प्रदान करतो.

VISTA 2k24 केवळ एक कार्यक्रम नाही तर तरुणांमधील प्रतिभा शोधून त्यांना सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहन देण्याच्या एक प्रयत्न आहे. क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा तीन मुख्य विभागांमध्ये 50 हून अधिक उत्कृष्ट कार्यक्रमांचा समावेश असलेला हा फेस्ट यंदा अधिक मोठा आणि भव्य होणार आहे. एनर्जीवाढवणाऱ्या क्रीडा स्पर्धा, मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम आणि बौद्धिकदृष्ट्या उत्तेजक अश्या शैक्षणिक स्पर्धाअशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांमुळे प्रत्येकासाठी सहभागी होण्याची आणि आनंद घेण्याची सुवर्ण संधी साईबालाजी एज्युकेशन सोसायटी देत आहे.

VISTA 2k24 ला खास बनवणारी गोष्ट म्हणजे नाविन्यपूर्णता आणि ऍथलेटिसिझमवर असलेला भर आहे. भारतातील एकमेव संस्था म्हणून ड्युएथलॉन स्पर्धेचे आयोजन साईबालाजी एज्युकेशन सोसायटी माघील अनेक वर्ष्यापासून करत आहे . या स्पर्धेत धावणे, सायकल चालवणे आणि पुन्हा धावणे अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे, आणि हे सर्व टप्पे ऑलिम्पिक अंतराचे असतात. ही अनोखी स्पर्धा सहभागींना मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे आव्हान देणारी आहे तसेच यातून सहभागींना आनंददायी अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न असतो. १८ ते २४ फेब्रुवारी २०२४ या काळात आयोजित होणाऱ्या VISTA 2k24 साठी तुम्ही
https://www.iimspune.edu .in या संकेत स्थळावर नोंद करु शकता.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनिष मुंदडा सर यांनी इंटर-कॉलेजिएट टेक्नो-मॅनेजमेंट कल्चरल फेस्ट मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया