ब्लेडने शरीर कापले, साखळीने बांधून जिवंत जाळले; एकतर्फी प्रेमातून मुलीचा दुर्देवी अंत

Software Engineer Brutally Murdered in Tamil Nadu: तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथून एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलगी साखळदंडात बांधून जळालेल्या अवस्थेत लोकांना आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. याबद्दल लोकांनी तत्काळ जवळच्या पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जळालेल्या मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

साखळदंडांनी बांधून जिवंत जाळले
23 डिसेंबरच्या रात्री थळंबूरच्या दक्षिण उपनगरात ही भीषण घटना घडली. आर नंदिनी (२५) असे मृत मुलीचे नाव असून ती सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. नंदिनी ही मूळची मदुराईची रहिवासी होती. सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीला आधी साखळदंडाने बांधून नंतर जिवंत जाळण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. याआधी मुलीची मान, हात आणि पाय ब्लेडने कापले होते.

या हत्येमागे ट्रान्ससेक्शुअलचा हात आहे
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस पथकाने संशयिताचा माग काढला. नंदिनीच्या हत्येमागे आधी पंडी माहेश्वरी आणि नंतर वेत्रीमारन बनलेल्या ट्रान्स-सेक्सुअल व्यक्तीचा हात असल्याचे नंतर उघड झाले.

एकतर्फी प्रेम
पोलिसांनी सांगितले की, नंदिनी आणि पंडी माहेश्वरी (२६) या दोघी मदुराई येथील एकाच हायस्कूलमध्ये एकत्र शिकत होत्या. काही काळानंतर माहेश्वरीने आपले नाव बदलून वेत्रीमारन ठेवले. यानंतर वेत्रीमारन आणि नंदिनी थोराईपक्कममधील एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये भेटले, जिथे त्यांनी ८ महिने एकत्र काम केले. यादरम्यान दोघे खूप चांगले मित्र बनले. कालांतराने नंदिनी वेत्रीमारनच्या प्रेमात पडली.

आरोपींना अटक
परंतु कालांतराने नंदिनी वेत्रीमारनपासून दूर राहू लागली आणि तिने त्याच्याशी मैत्री तोडली. यानंतर नंदिनी इतर मुलांशी बोलू लागली. त्यामुळे वेत्रीमारन संतापला. रागाच्या भरात वेत्रीमारनने नंदिनीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी वेत्रीमारन याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“सीमा हैदरला कुणी ओळखतही नाही”, पाकिस्तानातून भारतात परतलेल्या अंजूने असे का म्हटले?

“आमची भांडणं फक्त मैदानात…”, विराटबाबत गौतम गंभीरच्या वक्तव्याने जिंकली मने

“ब्राह्मणांना आरक्षण नाही, हे परमेश्वराचे मोठे उपकार आहेत”, नितीन गडकरी यांचं मोठं विधान