“आमची भांडणं फक्त मैदानात…”, विराटबाबत गौतम गंभीरच्या वक्तव्याने जिंकली मने

Gautam Gambhir On Virat Kohli: आयपीएल 2023 दरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मैदानावरील वादाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. या वादाची भरपूर चर्चा झाली होती. मात्र आता गंभीरने विराटसोबतच्या आपल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

गौतम गंभीरला प्रश्न विचारण्यात आला की, “विराटने कोणत्या गोलंदाजाविरुद्ध वनडेमध्ये 50 वे शतक झळकावले?” या प्रश्नाचे उत्तर गौतम गंभीरने ‘लॉकी फर्ग्युसन’ असे दिले. यानंतर गौतम गंभीर म्हणाला, “म्हणून तुम्ही हे पुन्हा पुन्हा दाखवा, कारण मला सर्व काही आठवते. माझी लढत फक्त मैदानावर आहे.”

गंभीरच्या या उत्तराने त्याचा सहकारी क्रिकेट तज्ज्ञ पीयूष चावलासह सर्वजण आश्चर्यचकित झाले. आयपीएल 2024 च्या आधी, गंभीरची आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केकेआरने वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. गंभीर म्हणाला की ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज हे एक्स-फॅक्टर आणि गोलंदाजी आक्रमणाचे प्रमुख असतील.

लिलावादरम्यान दुबईत उपस्थित असलेल्या गौतम गंभीरने स्टार्कबद्दल सांगितले होते, “तो (स्टार्क) एक एक्स-फॅक्टर आहे, यात काही शंका नाही. डेथ ओव्हर्समध्ये नवीन चेंडू टाकून गोलंदाजी करू शकतो. आणि महत्त्वाचे म्हणजे तो गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करू शकतो.”

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली