राडा भोवला : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

Har Har Mahadev Controversy: ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि कार्यकर्त्यांनी नुकताच ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा चालू शो बंद पाडला. तसेच काही प्रेक्षकांना मारहाण देखील केल्याचा आरोप आहे.

या राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. वर्तकनगर पोलिसात गुन्हा कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तक्रार करण्यात आली होती तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शंभर जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आता याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.या अटकेनंतर आपण जामीन घेणार नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.(NCP leader Jitendra Awad arrested).

‘आझाद मराठी’चा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा