महाराष्ट्राची सर्वांगीण विकासाच्या दिशेची वाटचाल श्री गणरायाच्या कृपाशिर्वादाने अधिक गतिमान होवो – अजित पवार 

मुंबई – श्रीगणरायाच्या कृपाशिर्वादाने कोरोनामुक्तीच्या (Corona) वाटेवर असलेला महाराष्ट्र आणि देश संपूर्ण कोरोनामुक्त होऊ दे… गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) निमित्ताने श्री गणपती बाप्पांच्या आगमनासोबत घराघरात आनंद, उत्साह, चैतन्य, भक्तीचे वातावरण येवू दे…शेतकऱ्यांच्या शिवारात पिकांची, घरात धनधान्याची समृद्धी येवू दे… राज्यात सर्वांना सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य लाभू दे… प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राची सर्वांगिण प्रगतीच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल श्रीगणरायाच्या आशिर्वादाने अधिक गतिमान होवू दे, अशी प्रार्थना करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी श्री गणरायाला भक्तीपूर्ण वंदन केले असून सर्व गणेशभक्त, राज्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा साजरा होत असलेला गणेशोत्सव सर्वांनी कुटुंब, मित्र, नातेवाईक, एकमेकांच्या सोबतीने आनंदाच्या, उत्साहाच्या, भक्तीमय वातावरणात, शिस्त व नियमांचे पालन करुन साजरा करुया, असे आवाहनही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.