सचिन वाझे माफीचा साक्षीदार घोषित; अनिल देशमुख यांच्याविरोधातील सर्व माहिती देणार 

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरण (Mansukh Hiren murder case)  आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणात (Antilia Blast Case) कोठडीत असणार्‍या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा (Sachin Waze) माफीचा साक्षीदार होण्यासाठीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. सचिन वाझेने (Sachin Vaze) १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला अटी-शर्तींसह मंजुरी देण्यात आली आहे.

7 जूनच्या सुनावणीत वाझेला प्रत्यक्ष कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. या प्रकरणात आता सचिन वाझे नियमित जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार आहेत. संबंधित गुन्ह्यात सचिन वाझे हे सहआरोपी आहेत.

मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असताना अनिल देशमुख यांचे खासगी स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांच्या वतीने संबंधित अर्जाला विरोध करण्यात आला. पण शिंदे यांच्या अर्जावर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. एक आरोपी दुसऱ्या आरोपीच्या माफीचा साक्षीदार होण्यावर आक्षेप घेऊ शकत नाही, असं म्हणत न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.