शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; आंदोलकांनी चपला फेकल्या,बांगड्याही फेकल्या

मुंबई – एसटी कर्मचारी आज पुन्हा एकदा आक्रमक झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली आहे. यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक करण्यात आली आहे. तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकण्यात आल्या आहेत.

एसटीच्या विलीनीकरणात (ST workesrs) शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात येत आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. पोलिसांनी काही आंदोलनकांना ताब्यातही घेतले आहे. आता एसटी कर्मचारी आणि पोलीस यांच्यात वाद रंगतानाही दिसून येत आहे. शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारमतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.