आयपीएल २०२४ पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा ‘या’ २ खेळाडूंना डच्चू, खराब फॉर्मशी होते झुंजत

Delhi Capitals, IPL 2024: आयपीएल 2024 पूर्वी (IPL 2024) दिल्ली कॅपिटल्सने मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, दिल्ली संघाने भारतीय फलंदाज मनीष पांडे आणि देशांतर्गत क्रिकेट स्टार सरफराज खानला सोडले आहे. लिलावापूर्वी दिल्लीने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली संघाने २०२३ च्या आयपीएलमध्ये नवव्या स्थानावर स्पर्धा पूर्ण केली.

वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, दिल्ली कॅपिटल्सने सरफराज खान (Sarfaraz Khan) आणि मनीष पांडे यांच्याशी फारकत घेतली आहे म्हणजेच त्यांना सोडले आहे. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या मनीष पांडेने (Manish Pandey) 2023 च्या स्पर्धेत संघासाठी 10 सामने आणि 9 डावात केवळ 160 धावा केल्या. मनीष पांडेने आतापर्यंत 170 आयपीएल सामने खेळले आहेत, 158 डावात त्याने 29.07 च्या सरासरीने आणि 120.97 च्या स्ट्राईक रेटने 3808 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत.

तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध करणारा यष्टिरक्षक फलंदाज सर्फराज खान आयपीएलमध्ये आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. आयपीएल 2023 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी 4 सामन्यांत केवळ 53 धावा केल्या. अशा स्थितीत खराब कामगिरीमुळे दिल्लीने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. सरफराजने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 50 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 37 डावांमध्ये 22.50 च्या सरासरीने आणि 130.58 च्या स्ट्राइक रेटने 585 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली

सनातन धर्म सगळ्यांना जोडणारा आहे – Devendra Fadnavis