रणनीती बनवून अभ्यास केला आणि युपीएससीत यश मिळवले : श्रुती शर्मा

नवी दिल्ली – देशाची पहिली आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी (३० मे) जाहीर झाला. यात उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील रहिवासी असलेल्या श्रुती शर्मा हिने पहिला क्रमांक पटकावला.

श्रुती सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीची माजी विद्यार्थिनी आहे. तिने जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमीमध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली होती. हे यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि संयम आवश्यक असल्याचे तिने सांगितले.

गेल्या चार वर्षांपासून सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत असलेली श्रुती म्हणते, ‘रोज जमेल तेवढा जास्त अभ्यास करत होते.अभ्यासाचे तास दिवसात मोजले जात नाहीत, परंतु त्यासाठी कठोर परिश्रम नक्कीच लागतात. रणनीती बनवून अभ्यास केला आणि यश मिळवले .श्रुतीने तयारी करून लोकांना जे आवडते, तेच करावे, असा संदेश दिला.