ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी आक्रमक; शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई : परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे.

आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर हजारो विद्यार्थी जमा झाले आणि त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषबाजी सुरू केली. काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थी त्याविरोधात आक्रमक झाले आहेत.

कोरोनाकाळात परीक्षा ऑफलाईन घेण्याला विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध पहायला मिळात आहे, त्यामुळे सरकार आता निर्णय बदलून परीक्षा ऑनलाईन घेत विद्यार्थ्यांची मागणी मान्य करणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.