उद्धव ठाकरे यांच्या सारखा निष्क्रीय मुख्यमंत्री आजवर पाहिला नाही -चंद्रशेखर बावनकुळे

रत्नागिरी- महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या इतिहासात आपण गेली वीसवर्ष काम करतोय पण आजवरच्या इतिहासात उद्धव ठाकरे यांच्यासारखा निष्क्रिय मुख्यमंत्री आपण पहिला नाही, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी येथे बोलताना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय गतिशील कारभार करत आहेत, काम करत आहेत. मागच्या अडीच वर्षाचा बॅकलॉग ते भरुन काढत आहेत. दररोज अठरा अठरा तास ते लोकांना भेटत आहेत, या शब्दात त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचे कौतुक केले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याच नाव घ्यावे लागेल मागच्या 24 महिन्यांच्या काळात केवळ अठरा महिने मंत्रालयात न येता केवळ फेसबुक लाईव्ह वरून कारभार करत मंत्रिमंडळाच्या बैठकितही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच सहभागी राहीले. यापूर्वी आपण अनेक मुख्यमंत्री पहिले अशोकराव अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण विलासराव देशमुख हे सारे मुख्यमंत्री आपण अनुभवले. आपण गेले 20 वर्ष विधिमंडळात आहोत. मात्र असा निष्क्रिय मुख्यमंत्री आपण कधी पाहिला आहे, अशी सडकून टीका चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी रत्नागिरी पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडीच्या काळात केवळ सत्तेसाठी पैसा पैशासाठी सत्ता असा कारभार होता अशी टीका त्यांनी यावेळी केली.