विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, गणवेशही मोफत; शिक्षणसेवकांच्या मानधनातही भरघोस वाढ

मुंबई – महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Government) सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) आज सादर केला गेला. राज्य शासनाच्या खजिन्यातून नागरिकांसाठी नेमकी किती आर्थिक तरतूद केली जाणार याकडे लक्ष लागले असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण क्षेत्रासाठी अनेक महत्वाच्या घोषणा यावेळी त्यांनी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ – विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत
– 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये
– 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा – शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ
– प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
– माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये
– उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये
– पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये

शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ