LokSabha Election 2024 | दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड निवडणूक लढवणार ? 

लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election 2024) महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीतील भाजपा पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडी देखील जोरदार तयारी करत असून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी निवडणूक लढवावी, यासाठी पक्षनेतृत्वाकडून आग्रह केला जात असल्याचे समजते.

शिवसेनेतील फुटीनंतर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणं पसंत केलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढवणार, याबाबतचा सस्पेन्स आहे. असं असतानाच निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वर्षा गायकवाड यांना अनुकूल स्थिती असल्याचं सांगत काँग्रेस हायकमांडकडून त्यांना उमेदवारी (LokSabha Election 2024) देण्याबाबत आग्रह केला जात असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मागील दोन टर्मपासून या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार निवडून आलेला असताना उद्धव ठाकरे ही जागा सहजासहजी काँग्रेसला सोडणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र काँग्रेसकडून खरंच वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी हट्ट करण्यात आल्यास महाविकास आघाडीत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज