Narayan Rane | रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंतांची माघार? नारायण राणेंचा मार्ग मोकळा?

Narayan Rane | महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काही जागांवरुन अद्यापही शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये चर्चा सुरू असल्याचे समजत आहे. अशातच भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेची रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ताकद नसून भाजपने उमेदवारी दिली, तर मी लोकसभा निवडणूक लढवीन आणि जिंकून येईन, असे प्रतिपादन केले. यानंतर शिवसेनेचे नेते व रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील लोकसभेचे चर्चित नाव किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे.

किरण सामंत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे माघार घेतल्याची माहिती दिली आहे. नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी व अब की बार ४०० पारसाठी रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार-किरण सामंत. असा दोन ओळींचा संदेश किरण सामंत यांनी लिहिला आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. मात्र अधिकृतरित्या याबाबत किरण सामंत यांनी माध्यमांसमोर येऊन माहिती दिलेली नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती