‘बाळासाहेबांनी पवारांविषयी जे वक्तव्य केले होते ते लायकी नसलेल्या पडळकरांनी करणे शोभत नाही’

 पुणे – गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीची पोलखोल सुरु केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेत्यांवर टीका करणाऱ्या पडळकर यांच्या भाषेवर अनेकांचा आक्षेप आहे.मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील याच मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे.

ते म्हणाले, पडळकर   जी वक्तव्ये करीतआहेत, ती जाणीवपूर्वक करत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कुठलेही वक्तव्यकेले तरी जनता ते स्वीकारत होती. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्याविषयी जे वक्तव्यकेले होते ते लायकी नसलेल्या पडळकरांनी करणे शोभत नाही, अशी घणाघाती टीका मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली आहे.

गोपचंद पडळकरांनी देवेंद्र फडणवीसांना(Devendra Fadnavis) गुरू मानले आहे. तेव्हा फडणवीसांनीही आत्मचिंतन करण्याची गरजआहे. आपल्या पिलावळांना समजून सांगितले पाहिजे, असे शेळके म्हणाले. दरम्यान, आता या टीकेला भाजप कसं उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.