Sunetra Pawar | सुनेत्रा पवारांनी घेतली प्रचारात आघाडी, विविध समाज घटकांचा मिळतोय पाठींबा

Sunetra Pawar :- पवार कुटुंबासाठी बारामती लोकसभा निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली असून त्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. बारामतीत महायुतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) आणि महाविकास आघाडीतून खासदार सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) अशी लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारात सुसूत्रता दिसून येत आहे.

सुनेत्रा पवारांना मिळतोय विविध घटक आणि समाजांचा पाठिंबा
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी नियोजनबद्ध प्रचारात आघाडी घेतली आहे. सुनेत्रा पवार या दररोज समाजातील विविध घटकांची तसेच विविध समाजाच्या गाठीभेटी घेत आहेत. तसेच गावभेट दौरा व जनसंपर्क अभियान राबवत आहेत. त्यातून त्यांचा सूक्ष्म पातळीवर प्रचार सुरू आहे. सुनेत्रा पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देत तेथील लोकांशी संपर्क साधला तसेच शहरी भागातील विविध सोसायट्या, मंडल यांना भेटी देण्याचा धडाका लावला आहे . यावेळी नागरिकांच्या अडीअडचणी त्या समजून घेत आहेत. या समस्या कशा सोडवता येईल आणि भविष्यात गावांच्या विकासासाठी कसा प्रयत्न करता येईल, याबाबत चर्चाही त्या घटकांशी करत आहेत. यावेळी आपल्या कार्याने गावाची मान उंचावणाऱ्या विविध भगिणींच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायलाही त्या विसरल्या नाहीत.

दुसरीकडे दररोज वेगवेगळ्या गावभेटी आणि जनसंपर्क अभियानादरम्यान त्या विविध धार्मिक स्थळांना देखील भेटी देताना दिसत आहेत. दौंडभेटीदरम्यान त्या स्वामी समर्थांच्या चरणी लीन झाल्या. छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेतले. देऊळगड गाडा येथील मुस्लिम समाजाच्या भेटीवेळी नजीकच्या दर्ग्याचे दर्शन घेतले, इंदापूर दौऱ्यावर असताना मुलेवाडीतील सुफी हाजी हाफिज फत्ते मोहम्मद जोधपुरी दर्गा येथे दर्शन घेतले. त्यामुळे हिंदू बांधव, मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाजाकडूनही त्यांना मोठा पाठींबा मिळताना दिसत आहे.

दररोज समाजातील विविध घटक आणि गावभेटींमधून सुनेत्रा पवार यांना मिळणारा पाठिंबा यामुळे त्यांचे पारडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | आम्हाला पडणारं मतदान निश्चित आहे; मोहोळांबाबत धीरज घाटेंनी व्यक्त केला विश्वास

Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात कुणाचे पारडे जड? राजकीय गणितं काय ?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘बूथ विजय अभियान’, प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार